Sunday, December 30, 2018

भुत्याणे गावाबद्दल थोडक्यात

                     भुत्याणे हे नाशिक जिल्हा चांदवड तालुक्यातील गाव आहे.  गाव मुंबई - आग्रा हायवे पासुन २ कि.मी. अंतरावर आहे. गाव हे नारायनी नदिच्या काठी वसलेले आहे. तसे बघायला गेले तर हे गाव छोटे आहे. परंतु ह्या गावात बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत. गावाची कुटुंब संख्या जेमतेम २७२ आणि लोकसंख्या जेमतेम  १४५१  आहे परंतु गावाची गावकरी आणि गावातील पुढारी मंडळी हि सर्व एकजुटीने गावात सर्व योजना आणि गावासाठी असलेली सर्व कामे हे राबवत असतात .
                          अलीकडच्या काळातच ग्रामपंचायत हि  "ISO" करण्यात आलेली आहे व ISO नामांकन हि मिळालेले आहे. ग्रामपंचायतीला हा मन मिळाल्यामुळे गावातील जनता हि खुप खुश आहे . आणि नवनवीन योजना राबवण्यासाठी उत्सुक आहेत. अलीकडील काळात ग्रामपंचायतीची निवड हि  स्मार्ट व्हिलेज म्हणून नाशिक जिल्ह्यात नामांकन दिलेले आहे .तसेच पाणी फाउंडेशन मध्ये हि भाग घेतलेला आहे . गावाची निवड हि जलयुक्त अभियानासाठी निवड झालेली आहे. गावातील वैशिष्ट म्हणजे गावात वेगवेगळे ग्रुप  व मंडळे आहेत  ग्रुप / मंडळांच्या माध्यमाने गावात अनेक प्रकारची कार्यक्रमे व योजना राबवण्यात येतात जसे गावातील यात्रे मध्ये सहभाग , गावात रस्त्यावर मुरूम टाकणे गावातील रस्ते व्यवस्थित करणे , गावात साफ सफाई करणे . ह्याच सर्वांच्या माध्यमाने गावाची विकासाकडे वाटचाल सुरु आहे .भुत्याणे गावात देवस्थाने म्हटले तर एक अंबिका माता मंदिर हे जागृत देवस्थान आहे व  प्राचीन भागेरथेश्वर महादेव मंदिर आहे. सर्वात महत्वाचे म्हटले तर या गावात राष्ट्रीय पक्षी मोर मोठ्या प्रमाणात आढळतात.